भूसंपादन विधेयकाविरोधात विरोधी पक्षांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा

March 17, 2015 2:02 PM0 commentsViews:

farmer38017 मार्च : भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेससह इतर दहा विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधक आज संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना निवेदन देणार आहेत.

भूसंपादन विधेयकाला विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून तीव्र विरोध केला आहे. भाजपने बहुमताच्या जोरावर लोकसभेत हे विधेयक मंजूर केले. त्यानंतर आता राज्यसभेची मंजुरी मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, या विधेयकाविरोधात विरोधकांची एकजूट झाली असून, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह जेडीएसचे एचडी देवेगौडा, सीपीएमचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी राजा, यांच्याबरोबर तृणमूल, सप, द्रमुक, भारतीय लोकदल आणि आरजेडीचे नेतेही या पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता संसदभवन ते राष्ट्रपती भवानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर भूसंपादन विधेयकाच्या विरोधातील निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close