येऊरच्या आश्रम शाळेतल्या मुलांना शिक्षकांनी दिले चटके

October 3, 2009 9:29 AM0 commentsViews: 8

3 ऑक्टोबर ठाण्यातल्या येऊर परिसरात असणार्‍या विवेकानंद अनाथ आश्रम शाळेत लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची घटना समोर आली आहे. यातल्या काही मुलांना चटके दिले गेलेत तर काहींना मारहाण करण्यात आली आहे. अनाथ आश्रमच्या ट्रस्टीकडून एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. इथं जेवणही अत्यंत निकृष्ट दर्जाचं मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

close