मुसळधार पावसाने सोलापुरात घेतले 5 बळी

October 3, 2009 9:32 AM0 commentsViews: 2

3 ऑक्टोबर सोलापुरातल्या सांगोला तालुक्यात पावसाने 5 जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात गेल्या 15 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. निजामपूर गावातला ब्रिटिशकालीन तलाव फुटून गावात पाणी शिरलं आहे. माण नदी पात्र सोडून वाहतेय. पावसाचा सर्वाधिक फटका मात्र ग्रामीण भागाला बसला आहे. पंढरपूर-कराड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. तर पंढरपूर-पुणे रस्ता बंद झाला आहे. पंढरपूर-कोल्हापूर हा रस्ताही बंद झालाआहे. तर सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असलं तरी फलटण, माण, खटाव या दुष्काळी भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतायत. या पावसामुळे पिण्याचं पाणी, गुरांच्या चार्‍याचा प्रश्न सुटेल तसेच रब्बी हंगामालाही मदत होईल असं मत शेतकरी व्यक्त करतायत.

close