शरीरसुखासाठी नाकारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळलं

March 17, 2015 5:16 PM0 commentsViews:

akola news17 मार्च : प्रेमाचे संबंध प्रस्तापित करुन शरीर सुखाची मागणी करणार्‍या नराधम प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात घडलीय. प्रेयसी मुलगी ही 80 टक्के भाजली असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपी अरुण सभादिंडेला अटक करण्यात आली आहे.

दोन वर्षांपासून प्रेमसंबंध प्रस्तापित करून वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील भर जहागीर इथल्या अरुण वैजनाथ सभादिंडे या नराधम युवकाने आपल्या प्रेयसीला शरीर सुखाची मागणी केली, मात्र ही मागणी नाकरल्याने संतप्त झालेल्या अरुणने मुलीला जिवंत जाळलं असल्याचं मुलीनं सांगितलं. या प्रकरणी आरोपी सोबत प्रमिला सरकटे नावाची विवाहित ही असल्याचं सांगितलंय. पीडित मुलीला काहीही न सांगण्याची धमकी दिल्यामुळे मुलीनं आपल्या जबाबात दिव्यामुळे जळाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुलीचा भाऊ मुंबईवरून वाशीम आल्यानंतर सर्व प्रकरण उघड झालंय. आणि मुलीच्या भावाने पीडित मुलीचा जबाब पुन्हा घेण्याची विनंती केलीय. मात्र पोलिसांनी सदर प्रकरणी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप मुलीच्या भावाने केलाय. अकेर मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close