टोळक्याचा मुजोरपणा, तरूण-तरुणीला लाथाबुक्याने मारहाण

March 17, 2015 6:46 PM0 commentsViews:

up news4417 मार्च : उत्तरप्रदेशमध्ये एका सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणी आणि तरूणाला लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या टोळक्याने तरुणीचा विनयभंग करून मारहाण केली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलीये. हे तरूण ऐवढ्यावर थांबले नाही तर या तरुणांनी याचा व्हिडिओ रेकॉर्डही केलाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आलाय.

उत्तरप्रदेशातील हाथरसमधील रविवारी ही घटना घडली. पीडित तरुणी शाळेतून आपल्या मित्रासोबत बाईकवरून घरी जात होती. तेव्हा रस्त्यात गावातल्या 6 तरुणांनी या दोघांना अडवलं. नंतर त्यांना दोघांना निर्जन ठिकाणी घेऊन गेले. आणि त्यांनी त्या मुलीचा विनयभंग केला आणि या मुलाला बेदम मारहाण केली. त्या दोघांनी या तरुणांना विनंती केली पण, या तरुणांनी लाथा बुक्याने मारहाण केली. या टोळक्यातील एकाने ही सर्व घटना मोबाईलवर रेकोर्डिंग केली. दोन दिवस हा व्हिडिओ व्हॉटसऍप आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याय. या धक्क्यादायक प्रकारामुळे मुलीनं ही घटना तिच्या घरी सांगितली नाही. पण गावभर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या व्हिडिओच्या आधारे 6 पैकी 4 आरोपींना अटक केलीय. 2 जण फरार आहेत. हे सर्व आरोपी गावातलेच आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close