रखडलेला महाराष्ट्र : औरंगाबादचं घाटी रुग्णालयच व्हेंटिलेटरवर !

March 17, 2015 9:34 PM1 commentViews:

ghati abad44417 मार्च : औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी घाटी रूग्णालय जीवनवाहिनी आहे. मराठवाडा विदर्भ आणि खान्देशचे रूग्णालयात उपचारासाठी मोठया प्रमाणात येतात. पण आज मात्र या रुग्णालयाची अत्यंत वाईट अवस्था आहे. रुग्णांचे हाल होतायत. ‘रखडलेला महाराष्ट्र’मध्ये राज्यातल्या रुग्णालयांची ही दैना…

गोरगरीबांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा सेवा देण्यासाठी घाटी शासकीय रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र शासकीय अनास्थेमुळं घाटीची अवस्था आता पेशंटसारखी आहे. तज्ञ डॉक्टर्स आणि तंत्रज्ञाच्या अभावी घाटी रूग्णालयाच्या अनेक महत्वाच्या सेवा बंद अवस्थेत आहेत. अकराशे खाटांची मर्यादा असणार्‍या घाटीवर जवळपास चार हजार खाटांचा भार आहे. एकीकडे रूग्णांचा भार वाढतो आहे. मात्र, शासणानं घाटी रूग्णालयाच्या निधीमध्ये 20 टक्के कपात केलीय. त्यामुळं अनेक गोष्टी रूग्णांना बाहेरून खरेदी करणं भाग पडतं…तज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळं अनेक विभाग बंद अवस्थेत आहेत.

घाटी रूग्णालायत रूग्णाना छोटया छोट्या सुविधांअभावी कसा त्रास सहन करावा लागतो हे पहा…जखमी आजोबांपडून जबर जखमी झाले…त्यांना चालता येत नाही…मात्र रूग्णालयाच्या कर्मचार्‍यांना त्यांना साधा स्ट्रेचर पुरवला नाही. आजोबांच्या नातेवाईकांनी त्यांना
चालवतच बाहेर आणलं.

घाटी शेवटीची घटका

1–ट्रॉमा केअर युनिट तंत्रज्ञ आणि तज्ञ डॉक्टरांच्या अभावी बंद
2–मेंदू विषयक ऑपरेशन होवू शकत नाहीत.
3–मुत्ररोग विभाग तज्ञांअभावी बंद
4–ह्रदय विभागात तज्ञ डॉक्टरच नाही त्यामुळं बायपास ऑपरेशन नाही
5–मनोविकार विभाग बंद केवळ ओपीडी सुरू
6–स्वाईन फ्लू वॉर्डात केवळ पास व्हेंटिलेटर
7–घाटीच्या निधी मध्ये 20 टक्के कपात
8–अकराशे खाटांची मर्यादा चार हजार खाटांचा भार
9–घाटीत 350 डॉक्टर्सची कमतरता
10–घाटीत स्वच्छतेचा प्रश्न गंभीर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Lahuraje

    Aaata tari laksh dya CH saheb …………….

close