सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा

October 3, 2009 9:38 AM0 commentsViews: 28

3 ऑक्टोबरगेल्या 24 तासांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने उच्छाद मांडला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले आणि दोडामार्ग हे चार तालुके पुराच्या तडाख्यात सापडले. शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर भंगसाळ पुलावर पाणी असल्यामुळे तीन लक्झरी बसेस अडकून पडल्यात. यातले जवळपास 30 प्रवासी बसच्या टपावर बसून आहेत. कुडाळ शहर आणि आसपासच्या परिसराला पाण्याचा वेढा आहे. लोक आपापल्या घरांच्या छपरावर चढून बसलेत. सावंतवाडी तालुक्यालाही पुराचा फटका बसला आहे. बांदा आणि शेर्ले गावात पुराचं पाणी भरलं आहे. माडखोलजवळचं छोटं धरण फुटल्याने कारीवडे गावात पूर आला. तिथली दहा घरं जमीनदोस्त झालीत. कुडाळजवळच्या पिंगुळी, गुढीपूर गावांत पाणी आहे. पहाटेपासून तिथल्या लोकांना इतर लोकांनीच मिळेल त्या साधनांच्या मदतीने पाण्याच्या बाहेर काढलं. वेंगुर्ले तालुक्यातही पुराची परिस्थिती आहे.

close