राज्यावर 3 लाख 4 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर

March 17, 2015 10:24 PM2 commentsViews:

cm and mungantiwar3317 मार्च : राज्याचा अर्थसंकल्प बुधवारी सादर होणार आहे. पण, त्याअगोदर आज वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. फडणवीस सरकारने रोज घोषणाचा धडाका लावला खरा पण या पाहणी अहवालात राज्यावर तब्बल  3 लाख 4 हजार कोटींच्या कर्जाचं डोंगर असल्याचं समोर आलंय. कृषी आणि संबंधित क्षेत्रात 4 टक्के घट झालीय. तर 2013-2014 मध्ये राज्याचं उत्पन्न 15 लाख 10 हजार 132 कोटी रुपये इतक झालं असून ते मागील वर्षापेक्षा 14.2 टक्क्यांनी अधिक आहे. तसंच अहवालात राज्य उत्पन्नात 5.7 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले असून उद्योग आणि सेवा क्षेत्रातही अनुक्रमे 4 व 8.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं म्हटलंय.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. त्यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनावरही त्याचा परिणाम झाल्याचं मान्य करण्यात आलंय. राज्यात 2014 मध्ये सरासरीच्या 70.2 टक्के पाऊस पडला. 355 तालुक्यांपैकी मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील तालुके वगळता 226 तालुक्यात अपुरा, 112 तालुक्यात साधारण तर 17 तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. 2014 च्या खरीप हंगामात 145.79 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. तर दुसरीकडे दूध संकलनात वाढ झालीये. यंदा 3.5 टक्क्यांनी तर 4 टक्क्यांनी वाढला आहे. शासकीय व सहकारी दुग्ध संस्थांद्वारे झालेले दैनिक सरासरी दूध संकलनही वाढले असून ते 2013-14 च्या 39.2 लाख लिटरच्या तुलनेत 2014-15 मध्ये 43.3 लाख लिटर इतके झाले आहे. राज्याच्या साक्षरतेचे प्रमाण 82.3 टक्के असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक पाहणी अहवाल

– राज्यावर 3 लाख 4 हजार कोटींचं कर्ज
– राज्य उत्पादनात 5.7 टक्के वाढ अपेक्षित
– कृषी आणि संबंधित क्षेत्रात 4 टक्के घट
– उद्योग आणि संलग्न क्षेत्रात 8.1 टक्के वाढ अपेक्षित
– 2013-2014 मध्ये राज्याचं उत्पन्न 15 लाख 10 हजार 132 कोटी रुपये
– त्यातले 88.60 टक्के औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा
– कृषी आणि जोड धंद्यांचा हिस्सा 11.3 टक्के
– 231 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली
– 52.1लाख हेक्टर वनाखाली

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jai Maharashtra

    Hyala Kon Jawabdar? Bhikela lavla Maharashtra la..

  • Arun Kottur

    Here we politicians are yet to bothers
    In banks we provide budgetary support from the pockets of tax payers.
    We have mastered the art of misleading the people of our own country

close