कोकणात पावसाचा जोर ओसरला

October 5, 2009 9:10 AM0 commentsViews: 6

5 ऑक्टोबर कोकणातल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेकडो संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. भातशेती, घरं आणि इतर नुकसान झालं आहे जवळपास 2 कोटींपेक्षा जास्त. तर दोघांचा बळीही गेला आहे. सरकारी पंचनामे झाले असले, तरी बर्‍याच जणांना प्रत्यक्ष मदतीचं वाटप अजून झालेलं नाही. सावंतवाडी आणि कुडाळ या दोन तालुक्यांना पुराचा जास्त फटका बसला आहे. शेकडो घरं आणि हाता-तोंडाशी आलेली भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

close