काय होणार स्वस्त, काय होणार महाग ?

March 18, 2015 6:23 PM0 commentsViews:

drink 344318 मार्च : फडणवीस सरकारचा आज पहिला-वहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाला धक्का न लावता मुनगंटीवार यांनी मोजक्याच्या वस्तूंच्या दरात वाढ केलीये. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याची अंमलबजावणी करून दाखवली.

पण, दुसरीकडे बजेटमध्येही तळीरामांना चांगलाच दणका देत मद्य उत्पादनावरच्या करात वाढ केलीये.त्यामुळे मद्य आता महागणार आहे. तर दुसरीकडे मसाल्याचे पदार्थही महाग होणार आहे.

कर्करोगाशी लढा देणार्‍यांना आधार देत कर्करोगावरील औषधी स्वस्त केलीये. त्याचबरोबर दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या मागणीची आठवण करून देतबेदाणे आणि मनुकांवरच्या करातली सूट कायम असल्याचं जाहीर केलं.

काय होणार स्वस्त
- कर्करोगावरील औषधी
- वर्क बुक्स, वह्या स्वस्त होणार
- एलईडी बल्ब
- बेदाणे
- मनुके

काय महाग
- मद्य
- मसाले

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close