‘महा’बजेट : सावकारी पाशातून बळीराजाची सुटका

March 18, 2015 7:52 PM0 commentsViews:

badjet farmer4418 मार्च : गेल्या वर्षभरात अस्मानी संकटाने बळीराजा पुरता हैराण झाला. मात्र, आज राज्याच्या बजेटमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बळीराजांना दिलासा दिलाय. राज्यावर कर्जाचा डोंगर असतानाही मुनगुंटीवार यांनी अर्थसंकल्पात नव्या योजनांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. शेती आणि ग्रामीण भागासाठीही या बजेटमध्ये बर्‍यापैकी आर्थिक तरतूद करण्यात आलीये.

सर्वात महत्वाचे म्हणजे बळीराजाची सावकारी पाशातून सुटका करण्यात आलीये. सरकार 171 कोटी रूपये देऊन 2 लाख 23 हजार शेतकर्‍यांची सावकारी व्याजातून कर्जमुक्त सुटका करण्यात येणार आहे. तसंच कृषिपंपांसाठी 1 हजार 39 कोटी रूपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये मोतीरामजी लहाने कृषी समृद्ध योजना राबवणार आहे.

गारपिटीपासून संरक्षणासाठी द्राक्ष उत्पादकांसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. द्राक्ष बागायतदारांना विशेष प्रकारचं शेडनेट विकत घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणार आहे. त्याचबरोबर जलयुक्त शिवार अभियानासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीये.

‘महा’बजेट 2015 – शेती आणि शेतकरी

- सावकारी कर्जातून बळीराजाला मुक्ती मिळवून देणार
– 171 कोटी रूपये देऊन 2 लाख 23 हजार शेतकर्‍यांना सावकारी व्याजातून कर्जमुक्त करणार
– जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 7 हजार 272 कोटी रू.
– जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार येणार
– तरतूद व 2015-16 या वर्षात 38 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार
-1 हजार 39 कोटी रूपये कृषिपंपांसाठी अनुदान
– यवतमाळमध्ये मोतीरामजी लहाने कृषी समृद्ध योजना राबवणार
– कृषी यांत्रिकरणावर भर देणार
– द्राक्ष शेतीला गारपिटीपासून संरक्षण देण्यासाठी आर्थिक मदत देणार
– द्राक्ष बागायतदारांना विशेष प्रकारचं शेडनेट विकत घेण्यासाठी आर्थिक मदत
– जलयुक्त शिवार अभियानासाठी 1 हजार कोटी रू.
– अनियमित पावसामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान
– कृषिपंपांच्या उर्जिकरणासाठी 1 हजार 33 कोटी रुपयांची तरतूद
– शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी स्व. मोतीरामजी लहाने कृषी समृध्दी योजना
– या योजनेसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close