‘रखडलेला महाराष्ट्र’ची बजेटमध्ये दखल, नव्या एसटी आणि हॉस्पिटलसाठी भरीव तरतूद

March 18, 2015 8:24 PM0 commentsViews:

rakhadlela mha18 मार्च : अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर आम्ही महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प, रस्ते, एसटी महामंडळ आणि एसटी स्थानकांची दुरवस्था, हॉस्पिटलची दैना दाखवली होती. यासाठी आम्ही रखडेलेला महाराष्ट्र अशी मोहिमच राबवली होती. आमच्या या रखडलेल्या महाराष्ट्र मोहिमेची दखल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलीये. आजच्या अर्थसंकल्पात बसस्थानक नुतनीकरणासाठी आणि नव्या बस घेण्यासाठी मोठा निधी देण्यात आलाय.

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या ठिकाणच्या बसस्थानकांचे नुतनीकरण आणि नवीन एस.टी. बस खरेदीसाठी 140 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलीये.

तर रखडलेल्या शासकीय हॉस्पिटलच्या दुरावस्थेचं भीषण वास्तव्य आयबीएन लोकमतने दाखवलं होतं. यासाठी अर्थसंकल्पात पुणे, औरंगाबाद, अकोला, अंबेजोगाई जि. बीड, सोलापूर, नांदेड, मिरज जि. सांगली, धुळे, यवतमाळ, लातूर व नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा श्रेणीवाढ कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. या वर्षी यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.

नंदुरबार, मुंबई, अलिबाग, सातारा, गोंदिया, बारामती व चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकाम आणि प्रारंभिक सोयी सुविधांसाठी 135 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी यावर्षी 1996 कोटी रुपयांची तरतूद केलीये.

आरोग्य
- राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी यंदा 1996 कोटींची तरतूद
- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी 300 कोटी रूपये
- अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी 70 नवजात शिशू रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार
- राज्यात आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी 390 कोटी रूपये

ग्रामीण भागातले रस्ते
- ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना
- रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळांतर्गत 1 हजार 413 कोटी
- ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी एक हजार कोटी अतिरिक्त राखीव
 एस.टी. बस खरेदीसाठी 140 कोटी रुपयांची भरीव तरतूद

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close