राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराची माघार

October 5, 2009 9:16 AM0 commentsViews: 4

5 ऑक्टोबर अहमदनगर – पारनेर मतदार संघातले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मधुकर उचाळे यांनी अखेर सोमवारी माघार घेतली. पक्षातली बंडखोरी आणि अण्णा हजारे यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांना पाठिंबा जाहीर केल्याने निराश होऊन उचाळे यांनी माघार घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना पत्र पाठवून त्यांनी माघारीबाबत कळवलं आहे. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रवादीचे बंडखोर वसंत झावरे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर निर्णय होणार आहे.

close