वांद्रे सेनेचा बालेकिल्ला नाहीच, पोटनिवडणूक लढायला तयार -राणे

March 18, 2015 11:00 PM1 commentViews:

 rane 33318 मार्च : वांद्रे विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काहीही नाही. फक्त तिथे मातोश्री आहे. आपण कोकणी आहोत आणि कोणत्याही लढतीला घाबरतं नाही असं खुल्लं चॅलेंजच काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलंय. पक्षाने आदेश दिल्यास आपण वांद्रे विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास तयार आहोत असंही राणे स्पष्ट केलं. ते सिंधु कृषि पशु-पक्षी मेळ्याच्या उद्घाटनाला सिंधुदुर्गात आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबईचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नारायण राणे यांचं नाराजीनाट्य रंगलं होतं. मात्र, राणेंच्या या नाराजीनाट्यावर काँग्रेसने वेगळाचा तोडगा काढला. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून पोटनिवडणूक होणार आहे. विशेषत: अशी पोटनिवडणूक बिनविरोध होत असते.

पण, यंदा काँग्रेसने उमेदवार देण्याची घोषणा केलीये. आणि उमेदवारीसाठी नारायण राणे यांना विचारणा करण्यात आलीये. राणेंनी आपण लढणार की नाही याबद्दलचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवला होता. पण आज त्यांनी तो जाहीर केला. पक्षात आपण नाराज नाही. आणि पक्षात असल्यामुळे कुणीही मनधरणी करत नाहीये. तशी आवश्यकताही नाही कारण मी पक्षातच आहे. पक्षाला जर वाटलं तर वांद्रे पोटनिवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत असं राणेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर राणेंनी सेनेकडे मोर्चा वळवला. वांद्रे हा काही शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काहीही नाहीये. फक्त तिथे मातोश्री आहे. आमचे चांदूरकरचं अगोदर तिथे आमदार होते. त्यामुळे बालेकिल्ला असं काही नाही. मी कोकणी माणूस आहे लढतीला घाबरत नाही असं खुल्लं आव्हानच राणेंनी दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    राणेसाहेबांना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घायचा आहे त्याला कोण काय करणार ? जेंव्हा पासून काँग्रेस मध्ये गेले आहेत तेव्हां पासून स्वतःचा आक्रमक पणा हारवून बसले आहेत आता पुन्हा एकदा हरण्यासाठी तयार ? कॉंग्रेस यांना बळीचा बकरा बनवणार ? कॉंग्रेसने यांना होते नव्हते तेवढे संपवले, बांद्रा मधून बाळा सावंत २००९ मध्ये जवळ ७४२० मतांनी निवडून आले आणी २०१४ मध्ये ते( भाजपा बरोबर नसताना) जवळ -जवळ १५५९७ मतांनी निवडून आले आणी वरून राणे साहेबांच्या वर मालवण -सिंधुदुर्ग पेक्षा मुंबई तील लोकांचा जास्त रोष आहे, मग निवडणूक येथून पुढे लढवणार नाही असे जाहीर केले असताना कशाला नुसती उठाठेव करतायत… जि काही इब्रत बाकी आहे ती ही संपेल. बाकी ते सुज्ञ !!

close