रावसाहेब शेखावतांच्या प्रचारासाठी सुनील शेट्टी,अजरुद्दीन

October 5, 2009 9:20 AM0 commentsViews: 15

5 ऑक्टोबर राष्ट्रपतींचा मुलगा रावसाहेब शेखावत यांच्या प्रचारासाठी अभिनेता सुनिल शेट्टी आणि खासदार मोहम्मद अजरुद्दीन या स्टारमंडळींनी अमरावतीत रोड शो केला. शहरातल्या मुख्य चौकातून त्यांनी रॅली काढली. सुनिल शेट्टी आणि अजरुद्दीन यांना पाहण्यासाठी अमरावतीकरांनी चांगलीच गर्दी केली होती. या दोघांनीही शेखावत यांना मत देण्याचं आवाहन केलं. अमरावतीकरांच्या नजरा खिळल्या होत्या त्या अभिनेता सुनिल शेट्टी आणि खासदार अजरुद्दीन यांच्यावर, यावेळी मोटरसायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आलं होतं. राजेंद्र शेखावतां विरोधात सुनिळ देशमुख यांनी बडखोरी केल्याने त्यांच्यासमोर तगडं आव्हान आहे.

close