पूरग्रस्तांनी नाकारली सरकारची तुटपुंजी नुकसान भरपाई

October 5, 2009 9:23 AM0 commentsViews: 1

5 ऑक्टोबर पावसामुळे पडलेल्या घरांसाठी सरकार 4 हजार 800 रुपये नुकसान भरपाई देणार आहे. यामुळे सिंधुदुर्गातले पूरग्रस्त संतापले आहेत. त्यांनी ही तुटपुंजी भरपाई नाकारली आहे. शिवाय अल्प नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे अजूनही निधी आलेला नाही. पावसानं सिंधुदुर्गमध्ये 300 घरांचं नुकसान झालं आहे. तर 150 घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. पावसामुळे इथल्या प्रचारावरही पाणी फिरलं. पुरामुळे मोठ्या नेत्यांचे प्रचार सभा रद्द झाल्यात. पण पूरग्रस्तांना भेटी देऊन त्यांची मतं मिळवण्याची संधी जाऊ नये यासाठी सगळ्याच पक्षांचे उमेदवार धडपड करतायत.

close