वांद्र्यात भाजपचा उमेदवार नाही, सेना विरुद्ध राणे सामना निश्चित

March 19, 2015 3:53 PM1 commentViews:

uddav vs rane election4419 मार्च : सांगलीतीलं तासगाव आणि मुंबईतल्या वांद्रे पूर्व या दोन्ही मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाजप आपला उमेदवार उभा करणार नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. त्यामुळे वांद्रेमध्ये शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा सामना रंगणार हे स्पष्ट झालंय.

तासगाव आणि वांद्रे पोटनिवडणुकीत दोन्ही ठिकाणी उमेदवार त्या-त्या कुटुंबातले दिले जाणार आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार देणार नाही असं दानवेंनी स्पष्ट केलं. तासगावमध्ये दिवंगत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील. तर वांद्र पूर्व इथं दिवंगत बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथं भाजप उमेदवार उभा न करता शिवसेनेला पाठिंबा देणार आहे. वांद्रेमध्ये भाजप उमेदवार देणार नसल्यामुळे इथं शिवसेना विरुद्ध काँग्रेस अर्थात नारायण राणे असा रंगणार हे आता स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे राणेंना उमेदवारी अजून जाहीर झाली नाही मात्र तरीही राणेंनी निवडणूक लढण्यास तयार असल्याचं म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • VINOD

    RANE SAHEB UGACHACH BALICHA BAKRA HOU NAKA……..

close