मौका…मौका..,बांगलादेशला चिरडून भारताची सेमीफायनलमध्ये धडक

March 19, 2015 5:41 PM0 commentsViews:

ind vs bang win19 मार्च : भारताचा विजय रथ सुसाट निघाला असून आज आपला दुसरा शेजारी बांगलादेशला चिरडून सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. रोहित शर्माची धडाकेबाज सेंच्युरी आणि भारतीय गोलदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचे तीन तेरा वाजले. भारताने बांगलादेशवर तब्बल 109 रन्सने दणदणीत विजय मिळवलाय. 303 धावांचा पाठलाग करणार्‍या बांगला टीमला 193 धावांमध्ये गुंडाळलंय. विशेष म्हणजे सलग सातही सामने भारताने खिश्यात घालण्याचा पराक्रम गाजवून दाखवलाय. भारताच्या या दिमाखदार विजयाबद्दल देशभरात जल्लोष साजरा केला जातं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाची पाठ थोपाटली असून अभिनंदन केलंय.

भारताची इनिंग

मेलबर्नमध्ये रंगलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश क्वार्टर फायनल सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने सुरुवात तर सावध केली पण शिखर धवन 30 रन्सकरून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीही काही फार कमाल करू शकला नाही आणि फक्त 3 रन्स करुन तो माघारी परतला. पण दुसरीकडे रोहित शर्मा तडाखेबाज बॅटिंग करून टीम इंडियाची बाजू भक्कमपणे लावून धरली. रोहितच्या सोबतीला सुरेश रैनाने धडाकेबाज बॅटिंग केली. रोहितने 126 बॉलमध्ये 14 फोर आणि 3 सिक्स लगावत 137 रन्स केले. रोहित शर्माने वन डे करिअरमधील शानदार सातवी सेंच्युरी ठोकली. तर सुरेश रैनाने 57 बॉलमध्ये 67 रन्स करून शानदार इंनिंग पेश केली. रोहितने अखेरच्या ओव्हरपर्यंत फटकेबाजी सुरूच होती. पण 47 ओव्हरमध्ये रोहित आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन धोणी आणि रवींद्र जडेजाने जोरदार फटकेबाजी करून बांगलादेशमोर 303 रन्सचं आव्हान ठेवलं.

बांगलादेशची इंनिंग

टीम इंडियाने दिलेल्या 303 धावांच्या पाठलाग करणार्‍या बांगलादेशची अडखळत सुरूवात झाली. सहाव्या ओव्हरमध्ये बांगला पहिला झटका बसला. तमीम इक्बाल आणि आय कायस एकापाठोपाठ आऊट झाले. त्यानंतर बांगलादेशचा धडाकेबाज फलंदाज महमुदुल्ला टीमची धुरा सांभळण्यासाठी मैदानात आला. मात्र, शामीने आपल्या भेदक गोलदाजांच्या जोरावर त्याला पव्हेलेयिनचा रस्ता दाखवला. भारतीय गोलदाजांनी बांगलाच्या इतर कोणत्याही खेळाडूला मैदानावर जास्त वेळ टीकू दिलं नाही. सौमय सरकार, शाकीब हुसेन आऊट झाले. अवघ्या 109 रन्सवर बांगलादेशची अवघी अर्धी टीम तंबूत परतली होती. भारताकडून उमेश यादवने तुफान गोलदांजी करून 4 जण आऊट केले. तर शामी अहमद आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्यात. तर मोहित शर्माने एक विकेट घेतली.

धोणींच्या नेतृत्वाखाली 100 वा विजय

कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोणीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या टीमने आज आणखी रेकॉर्ड रचला. धोणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजयाची सेंच्युरी केली. बांगलादेशला हरवून वन डे सामन्यात भारताने हा 100 वा विजय मिळवलाय. विशेष म्हणजे वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सातही सामन्यात विरोधकांना एकही मौका न देता विजय मिळवलाय.

सेमीफायनमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी लढत

भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली खरी पण आता पुढची महत्वाची लढाई बाकी आहे. कारण, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये उद्या सेमीफायनलसाठी लढत रंगणार आहे. या क्वार्टर फायनल सामन्यात कोणतीही टीम जिंकली ती भारतासोबत सेमीफायनलमध्ये दोन हात करणार आहे. ऑस्ट्रेलिया जिंकली तर भारताचा सामना रंजक ठरले. आणि जर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि सेमीफायनलमध्ये धडक मारली तर सेमीफायनलाचा हा सामना भारत आणि पाकिस्तानासाठी तिसर्‍या युद्धाच्या बरोबरीचाच असणार आहे. पण,वाचक हो, हा क्रिकेटचा खेळ आहे इथं काहीही घडू शकतं…त्यामुळे उद्याच्या सामन्यात काय घडतं ते उद्या पाहुया…तोपर्यंत भारताच्या विजयाचा आनंद लुटूलाय…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close