एलईडी दिव्यांवरून सेना-भाजपमध्ये जुंपली

March 19, 2015 6:13 PM0 commentsViews:

sena bjp led19 मार्च : मुंबईमध्ये लावण्यात आलेल्या एलईडीच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांना लक्ष्य केलंय. गोयल यांनी एलईडी दिवे बसवण्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

2009 मध्ये ईईएसएल (EESL) ही कंपनी भारत सरकारनं स्थापन केली आणि 2014 मध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी या कंपनीला – 100 शहरांतील सध्याचे दिवे बदलून एलईडी बसवण्याचे काम दिले. कंपनीकडे स्वत:चे कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. कंपनीचं अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. दरम्यान, भाजपनं हे आरोप धुडकावून लावलेत. आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं भाजपनं म्हटलंय. आणि अण्णांना उपोषणाचा सल्ला दिल्यापेक्षा स्वत:च आंदोलन करावं असा टोला रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांना लगावलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close