वाळू माफियांचा उच्छाद, समाधीचे चौथरेही पुरेना !

March 19, 2015 6:33 PM0 commentsViews:

सुनील उंबरे, पंढरपूर

19 मार्च : पंढरपुरात वाळू चोरांनी उच्छाद मांडलाय.त्यांना देवदेवतांच्या समाधीचे चौथरेही पुरेनासे झाले आहे. महसूल प्रशासन मात्र, त्याकडे सोईस्कर डोळेझाक करतंय.

pandharpur_chothare34‘तुका म्हणे वाळवंट, बडवे नीट उत्तम…’ ऐकलंत तुम्ही चंद्रभागेच्या वाळवंटाचं अध्यात्मिक महात्म्य काय आहे ते…पण प्रत्यक्षात काय परिस्थिती तेही जरा बघुयात…तुम्हीच बघा वाळू माफियांनी अगदी संत मंडळींच्या समाधीचे चौथरे देखील उघडे पाडलेत. हे वाळू माफिया रात्रीच्या अंधारातच बिनदिक्तपणे वाळू चोरी करतात पण प्रशासन त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतंय.

सर्वोच्च न्यायालयाने खरंतर या वाळवंटात साधे तंबू मारायलाही मनाई केलीय. पण त्याचवेळी इथली वाळू चोरी अगदी बिनदिक्तपणे सुरू आहे आणि प्रशासन मात्र, सबबी सांगण्यातच धन्यता मानतंय.

चंद्रभागेतल्या नदीपात्रातला हा वाळू उपसा असाच सुरू राहिला तर ह्या समाधींचे चौथरे उघडे पडण्याचाही धोका संभवतोय. एवढंच नाहीतर उद्या समजा या नदीपात्रात वारीसाठी पाणी सोडलं तर या खड्‌ड्यामध्ये जमा होणार्‍या पाण्याचा अंदान न येऊन वारकरी बुडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही पण लक्षात घेतो कोण…?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close