एक खून माफ ; जिवंतपणीच पत्नीने पतीला ठार मारले !

March 19, 2015 7:12 PM1 commentViews:

latur news3319 मार्च : जिवंत असतानाच एका शिक्षकाच्या पत्नीनं नवर्‍याला मृत घोषित केलंय.एवढंच नाही तर पत्नीनं नवर्‍याचं मृत्यूपत्र काढून नवर्‍याच्या पगारावरही ताबा मिळवलाय. आता हा शिक्षक जिवंतपणीच आपलं मृत्यू प्रमाणपत्र रद्द करून आपल्याला पूर्ववत नोकरीवर घ्यावं यासाठी झगडतोय !

लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव इथं राहणारे हे आहेत पांडुरंग बिरादार…पांडुरंग हे मुदखेड पंचायत समितीत शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र त्यांना त्यांची बायको पगार माझ्याकडे दे म्हणून सतत त्रास द्यायची, अनेकदा तिने शाळेत जाऊन स्टाफच्या समोरच शिवीगाळ व मारहाणही केली असा आरोप बिरादार यांनी केलाय. सहकारी शिक्षक आणि आपल्याच विद्यार्थ्यांसमोर अपमान झाल्यानं बिरादार यांनी नोकरीच्या ठिकाणाहून बोरगाव गाठलं आणि ते तिथे राहू लागले. इकडे त्यांच्या पत्नीनंही सासरी बोरगाव येथे न जाता माहेरी उदगीरला वास्तव्य करणे पसंत केले. विभक्त राहतानाची काही वर्षे गेल्यानंतर जयश्री बिरादार यांनी त्यांचे पती पांडुरंग बिरादार जिवंत असताना उदगीर तहसील मधून त्यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र काढलं. या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे जयश्री बिरादार ह्या पतीला मिळणारी पगारही उचलत आहेत असा आरोप पांडुरंग बिरादार यांनी केलाय.

पांडुरंग बिरादार याचं गाव बोरगाव असलं तरी त्याचं मृत्यू प्रमाणपत्र उदगीर नगर परिषेदेने जारी केले आहे. एवढंच नाही तर नांदेड जिल्हा परिषदेनंही बिरादार यांच्या जिवंतपणाची अथवा रहिवाशी प्रमाणपत्राची खात्री न करताच जयश्री बिरादार यांच्या नावे पगार सुरू केला आहे .बायकोनंचं मृत घोषित केल्यानं पांडुरंग बिरादार यांना जिवंत असल्याचं सिद्ध करने अवघड जातंय.

पांडुरंग बिरादार यांची आणखीन दहा वर्षे नोकरी शिल्लक आहे. त्यामुळे खोटे असलेले मृत्यूप्रमाणपत्र रद्द करून आपणाला नोकरीवर घ्यावंअशी मागणी बिरादार करीत आहेत.

पांडुरंग बिरादार यांच्या पत्नीन कॅमेर्‍या समोर न येता त्यांच्यावर लावलेले आरोप हे चुकीचे असल्याचं म्हटलंय. मृत्यूप्रमाणपत्र हे आपण नियमानुसारच काढलं असल्याचं त्यांनी सांगतलंय. नवरा-बायकोच्या भांडणात सरकारी यंत्रणांनीही कमालीचा ढिसाळपणा बाळगून बिरादार यांना मृत घोषित केले आहे. आता तरी जिवंतपणी बिरादार यांना त्यांची नोकरी मिळेल का ? किंवा नवरा-बायकोतील हा वाद समोपचाराने मिटेल का ? हा प्रश्नच आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Meena Paes

    This is the height of Govt.apathy and indifference. Will govt own its responsibility for its gross lapse? Because a living man is declared dead! He has to go through hell when he is still alive.Wonderful! and how is it that none of the so called fighters for justice come forward to help him? Thanks! at least bringing this to the light.

close