सिध्दराम म्हेत्रे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

October 5, 2009 1:48 PM0 commentsViews: 6

5 ऑक्टोबर मंुबई हायकोर्टात सिध्दराम म्हेत्रे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र ती पूढे ढकलण्यात आली आहे. म्हेत्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सेशन कोर्टानं फेटाळल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. सिध्दराम म्हेत्रे यांच्यासह त्याचे भाऊ शंकर म्हेत्रे यांच्यावर खुनाचा आरोप आहे. याप्रकरणी शंकर म्हेत्रे यांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. अक्कलकोट शेगाव येथे 26 सप्टेंबर रोजी भाजपच्या प्रचार सभेत झालेल्या गोळीबारात भाजपचा कार्यकर्ता ठार झाला होता. हा हल्ला सिध्दराम म्हेत्रे याच्या सांगण्यावरूनच करण्यात आला अशी पोलिसात तक्रार केल्याने म्हेत्रे भावावर हा खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिध्दराम म्हेत्रे अक्कलकोट मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. सिध्दराम म्हेत्रे याच्या आजच्या अटकपूर्व जामीनाच्या निर्णयावर पोलिसांचं लक्ष आहे. अक्कलकोट मध्ये पोलिसांनी मोठा कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी रविवारी अक्कलकोटमध्ये सशस्त्र परेडही केली होती.

close