बापरे बाप…!, मुलीला कुत्रा चावला म्हणून कुत्र्यावर गोळीबार

March 19, 2015 7:52 PM0 commentsViews:

dog firing19 मार्च : रागावर नियंत्रण नसलं की त्याचा परिणाम किती भंयकर होतात याच उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं. घरातील पाळीव कुत्रा मुलीला चावला म्हणून कुत्र्यावर चार राऊंड गोळीबार केल्याची घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. सुरेश धपाटे अस गोळीबार करणार्‍या व्यक्तीचं नावं आहे.

सुरेश धपाटे यांच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे. सुरेशच्या घरातील पाळीव कुत्रा त्यांच्या मुलीला चावला म्हणून चक्क सुरेश यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यावर चार राऊंड गोळीबार केला. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. गोळीबारातील दोन तीन गोळ्या शेजारच्या घरावर जाऊन आदळल्या. शेजारी राहणार्‍या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सुरेश धपाटेंना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. गोळीबार करण्यामागे सुरेश यांचा हेतू काही वेगळाच होता का याचा पोलीस तपास करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close