कॉपीबहाद्दर आहेत की स्पायडर मॅन ?

March 19, 2015 8:28 PM1 commentViews:

bihar3319 मार्च : कॉपी करण्यासाठी काय उचापत्या करू शकतो याचा नेम नाही. बिहारमध्ये दहावीच्या परीक्षेवेळी कॉपी बहाद्दर चक्क ‘स्पायडर मॅन’च्या रुपात पाहण्यास मिळाले. बिहारमधल्या खागरिया आणि हाजीपूरमध्ये एका शाळेवर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट झालाय.

पेपर सुरू असताना शाळेच्या इमारतींच्या खिडक्यांवर कॉपी पुरवणार्‍यांच्या झुंबड उडाली होती. धक्कादायक म्हणजे चार मजली या इमारतीवर कॉपी बहाद्दर खिडक्यांवर चढून कॉपी पुरवत होते.

वरच्या मजल्यावर पोहचण्यासाठी दोरही बांधण्यात आला होता. इतकंच नाहीतर शाळेच्या आतसुद्धा विद्यार्थी खुलेआम कॉपी करत होते. याहुन कहर म्हणजे कॉपी बहाद्दरांना खुद्द शाळेचे कर्मचारी आणि सुपरवायझरच कॉपी पुरवत होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • pawan

    Bihar madhe navin nahi he

close