अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणी आयएसएस अधिकार्‍याला अटक

March 19, 2015 10:33 PM0 commentsViews:

rape-victims-19 मार्च : पुणे शहरात हिंगणे भागात तीन अल्पवयीन मुलींवर लैगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदचे महा संचालक मारूती सावंत यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. सावंत यांना या प्रकरणी अटक करण्यात आलीये.

मारूती सावंत हे आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते समाजकल्याणचे संचालक पदावर होत. सावंत यांनी तीन मुलींना अश्लील चित्रफित दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं असा पालकांचा आरोप आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशन अंतर्गत सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close