‘स्पेशल’ गुढी साता समुद्रापार

March 19, 2015 10:57 PM0 commentsViews:

गुढीपाडवा दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ठाण्यातल्या काही स्पेशल मुलांनी तयार केलेल्या या गुढ्या तर यंदाही साता समुद्रापार निघाल्यात. गेली 12 वर्षं या मुलांच्या या स्पेशल गुढ्या परदेशात जातायेत. घंटाळीच्या विश्वास गतिमंद संस्थेतल्या या मुलांनी अगदी रेशमापासून ते पैठणीपर्यंत अनेक आकर्षक गोष्टी वापरून या गुढ्या तयार केल्यात. छोटे बांबू,गडू यांनी सजलेल्या या गुढ्यांना कारसाठी आणि ऑफिसेसमध्ये खूप मागणी आहे. या स्पेशल गुढ्या तयार करताना या मुलांना मिळालेला आनंद खूपच स्पेशल आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close