राज ठाकरेंना मुझप्फरपूर कोर्टाचं अटक वॉरंट

October 6, 2009 9:14 AM0 commentsViews: 2

6 ऑक्टोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेचे आदेश बिहारमधल्या मुझप्फरपूर कोर्टानं दिले आहेत. राज यांना 2 नोव्हेंबरपूर्वी कोर्टात हजर करा, असं कोर्टानं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बजावलं आहे. बिहारींच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी मुझफ्फरपूर कोर्टात राज ठाकरेंच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टानं राज यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ते आदेश न पाळल्याने कोर्टाने राज यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.

close