रायबरेली रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 22 वर

March 20, 2015 11:35 AM0 commentsViews:

20 मार्च : उत्तर प्रदेशातील रायबरेली इथे जनता एक्स्प्रेस रूळावरून घसरल्याने 22 प्रवासी ठार झाले असून, 150 जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, डेहराडूनहून वाराणसीला निघालेल्या जनता एक्स्प्रेसला रायबरेली जवळील बछरावा स्थानकात अपघात झाला. एक्सप्रेस रेल्वे रूळावरून घसरल्याने पहिल्या डब्याचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, 150 प्रवासी जखमी झाले. जखमींना प्राथमीक उपचारांसाठी बछरावा इथल्या दवाखाण्यात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींना लखनऊ आणि रायबरेलीला हलविण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वेचे मदतकार्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close