टोलनाक्यांवर आमची का अडवणूक होते?, सर्वपक्षीय आमदारांची तक्रार

March 20, 2015 2:39 PM1 commentViews:

toll kolhapur

20 मार्च :  टोलनाक्यांवर सर्वसामान्य प्रवाशांची होणारी लूट सर्वांनाच माहिती आहे पण आमदारांनी मात्र, स्वत:चा टोल माफ करून घेतले आहेत पण त्यासाठी ओळखपत्रं दाखवावं गरजेचं असणार आहे. पण आमदारमहाशयांना हे ओळखपत्र दाखवणंही जड जाऊ लागलं आहे. ‘आम्ही आमदार असूनही प्रत्येक टोल नाक्यावर आम्हाला ओळखपत्र का मागितलं जातं, अशी तक्रार आमदार महाशयांनी विधानपरिषदेत केली आहे.

भाजप सरकार सत्तेवर येण्याआधी टोलमुक्तीची घोषणा केली होती. मात्र त्याबद्दल सरकार चकारशब्दही काढायला तयार नाही. एवढंच नाही तर अर्थसंकल्पात मुनगंटीवार यांनी टोल हा शब्दही उच्चारला नाही. मात्र जेव्हा आमदारांवर वेळ आली तेव्हा सगळ्या पक्षातल्या आमदारांनी एकत्र येऊन गळा काढला.

टोलनाक्यावर आमचे आयकार्ड का मागितले जातात, आम्हाला व्हीआयपी ट्रिटमेंट का दिली जात नाही असे एक ना अनेक प्रश्न सर्वपक्षीय आमदारांनी सभापती आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विचारायला सुरुवात केली. एवढंच नाही तर सर्व टोलनाक्यावर आमचे आयकार्ड पाठवून द्या म्हणजे ते आम्हाला ओळखतील अशी मागणीही या आमदरांनी केली आहे. पण एकीकडे एसटीला बसलाही टोल भरावा लागतो आणि दुसरीकडे हे आमदारमहाशय साधे ओळखपत्र दाखवयालाही काकू करत आहे. पण आमदारांना तरी कशासाठी टोल माफ करायचा असा सवाल जनता विचारू लागली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jai Maharashtra

    Sala sagla fukat kabra paije hyanle? Amhi Toll Bharto ta tumhi b bhara na rao

close