परतीच्या पावसाचा मुंबईला तडाखा

October 6, 2009 10:17 AM0 commentsViews: 3

6 ऑक्टोबर मंुबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळला. यामुळे मध्यरेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली. ऑफिसला जाणारे चाकरमानी तसंच विद्यार्थी त्यामुळे वैतागले होते. दुसरीकडं पावसानं कल्याणमध्ये 2 बळी घेतले. कल्याणमधल्या पत्री पुलाजवळची छोटी दरड कोसळून 1 ठार तर 4 जखमी झाले. या ठिकाणीच पावसानं साचलेल्या पाण्यात पडल्यानं एका तरुणानं जीव गमावला आहे. तर मुसळधार पावसामुळे अंबरनाथमधल्या भेंडीपाडा परिसरातील एक घर पडलं. त्यात एक लहान मुलगी जखमी झाली. सध्या मंुबईतला पाऊस थांबलाय. या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांच्या साठ्यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत शहरात 50.4 मि.मी., पूर्व उपनगरांमध्ये 119.8 मि.मी., पश्चिम उपनगरांमध्ये 73.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. नियंत्रण कक्षानं दिलेल्या माहितीनुसार शहरात कुठंही पाणी भरलेलं नाही. तसंच कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे आणि मुंबई परिसरातल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली आहेत.

close