विधान परिषदेच्या पडद्याआड आपण भाऊ मिळून खाऊ ?

March 20, 2015 4:51 PM0 commentsViews:

vidhansabha election sena ncp20 मार्च : विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीत ऐनवेळी राजकीय घडामोड घडली. शिवसेनेनं ऐनवेळी माघार घेतली आणि भाजपने बहिष्काराचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला. पण, यासाठी पडद्यामागे मोठी तडजोड झालीये. आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेचं उपाध्यक्षपद शिवसेनेला तर विधानपरिषदेचं उपसभापती भाजपला दिलं जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलीये. किंबहुना या फॉर्म्युल्यावरच आजची सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची तडजोड पडद्यामागे झालीये.

विधान परिषदेत संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादीने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आणि तो जिंकलाही. राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतल्यामुळे सगळ्यांच्या भुवय्या उंचावल्या. या पाठिंब्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती समोर आली. पण त्यानंतर राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने वेगळी रणनीती आखली.  शिवसेनेनं आमदार नीलम गोर्‍हे यांना उमेदवारी दिली. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती उघड पाडण्यासाठी सेनेनं उमेदवार दिला असल्याचं बोललं गेलं. अखेरीस आज ऐन निवडणुकीच्या पूर्वी मोठं नाट्य घडलं.

सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर गोर्‍हे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर भाजपने निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली. पण, बहिष्काराचा समझोता साजरा झाला खरा पण पडद्यामागं नेमकं काय घडलं. राष्ट्रवादीचा सभापती बिनविरोध निवडून आणताना सेना-भाजपने नेमकं काय पदरात पाडून घेतलंय. याबाबत सर्वानांच उत्सुकता आहे. पण, यानिमित्ताने शिवसेनेनं पुन्हा एकदा ऐन मोक्याला कच खालल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

दरम्यान, आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेचं उपाध्यक्षपद शिवसेनेला तर विधानपरिषदेचं उपसभापती भाजपला दिलं जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे, किंबहुना या फॉर्म्युल्यावरच आजची सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची तडजोड पडद्यामागं झाली असल्याची आयबीएन लोकमतच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close