अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणी मारुती सावंत निलंबित

March 20, 2015 7:12 PM0 commentsViews:

maruti sawant20 मार्च : अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्याचे माजी समाजकल्याण संचालक मारुती सावंत यांना निलंबित करण्यात आलंय. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत याबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घोषणा केलीये.

सावंत सध्याचे राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत. सावंत आयएएस अधिकारीही आहेत. पुण्यात त्यांच्या घराशेजारच्या वसाहतीत राहणार्‍या मुलींचं लैंगिक शोषण केलं, असा त्यांच्यावर आरोप आहे.

सावंत यांच्याविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलीय. कोर्टाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये. कोर्टाच्या आवारात आज मनसेच्या नगरसेवकांनी त्यांच्यावर चप्पल भिरकावली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close