महाडच्या चवदार तळ्याचं पाणी चवदारच !

March 20, 2015 8:21 PM0 commentsViews:

mahad tale20 मार्च : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळे सत्याग्रहाला आज 88 वर्षे पूर्ण होत आहेत. बरोबर 20 मार्च 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रह करून सामाजिक विषमतेविरूद्ध लढा पुकारला होता. तिथून पुढेच खर्‍याअर्थाने अस्पृश्येचा लढा तीव्र बनला आणि दिन दलितांना समाजाच्या मुख्यप्रवाहात येण्याची संधी मिळाली. अशा देदिप्यमान इतिहात या चवदार तळ्याचा आहे. पण मध्यंतरी हे तळं प्रदुषित बनलं होतं. पण डॉ.उदय शंकर भवाळकर यांनी सखोल संशोधन करून हे पाणी पुन्हा शुद्ध केलंय.

डॉ.उदय शंकर भावकर हे मुंबई आयआयटी येथे केमिकल इंजिनिअरींगचे प्राध्यापक होते व गेली 40 वर्षं ते यावर अभ्यास करीत होते. 40 वर्षांच्या अथक प्रयत्नाने त्यांनी हे निसर्गातील गुपित शोधून काढले आणि इतकेच नव्हे तर चवदार तळ्याचे पाणी शुद्ध आहे हे त्यांनी स्वत; आपल्या सहकार्यासोबत आणि महाड नगरपालिकेचे नगाराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या उपस्थिती प्राशन करून दाखवले, त्याचे
प्रयोगशाळेतील रिपोर्ट सुद्धा दाखवले.

चवदार तळं शुद्ध झाल्याचा आनंद महाड नगरपालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक यांना सुद्धा झाला असून नगर सेवक मोहम्मद पालावकर यांनी बोलून दाखवले. महाड चवदार तळे स्मारक समितीचे मधुकर गायकवाड यांना चवदार तळे शुद्ध झाल्याचा प्रचंड आनंद झाला असून त्यांनी याबद्दल आपल्या प्रामाणिक भावना व्यक्त केल्या.

आज बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी या महाडच्या चवदार तळ्याला भेट देत आहेत आणि हे पाणी पिऊन आंबेडकर यांनी जो समतेचा लढा सुरू केला त्याला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त करत आहे. एका भारतीय शास्त्राने बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली ही आगळी वेगळी आदरांजली ठरलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close