पी टी उषाला अपमानास्पद वागणूक

October 6, 2009 10:22 AM0 commentsViews: 6

6 ऑक्टोबर भारताची एकेकाळची आधाडीची ऍथलीट पी टी उषाला ऍथलेटिक्स फेडरेशनकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. फेडरेशनतर्फे भोपाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी तिला आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. त्यानुसार उषा काल भोपाळला पोहोचली. पण तिथं पोहोचल्यावर एकाही अधिकार्‍याने तिची दखल घेतली नाही. तिची राहण्याची व्यवस्थाही एका अत्यंत साध्या दर्जाच्या हॉटेलमध्ये इतर पाच महिला प्रशिक्षकांसोबत करण्यात आली होती. या प्रकारामुळे उषा दुखावली गेली. मीडियाने संपर्क साधला असता तर तिला रडू आवरलं नाही.

close