राजेंद्र सिंह यांना स्टॉकहोल्म वॉटर पुरस्कार जाहीर

March 21, 2015 2:44 PM0 commentsViews:

rajendra singh21 मार्च : भारताचा वॉटरमन म्हणून ओळखल्या जाणारे राजेंद्र सिंह यांना 2015 च्या स्टॉकहोल्म वॉटर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. जलसंधारणाबाबत त्यांनी केलेल्या कार्याचा यानिमित्तानं गौरव होणार आहे. मूळचे राजस्थानचे असलेले राजेंद्र सिंह यांनी दुष्काळी भागात शेतकर्‍यांना दिलासा देणार्‍या अनेक योजना राबवल्या. हा पुरस्कार मनोबल वाढवणारा आहे असं मत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलंय. यापूर्वी राजेंद्र सिंह यांना 2001 मध्ये मॅगसेस पुरस्कारानंही गौरवण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close