शिवसेनेने केला प्रचारासाठी सार्वजनिक जागेचा वापर

October 6, 2009 12:59 PM0 commentsViews: 3

6 ऑक्टोबर वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आ.राजेंद्र पाटणी यांनी सार्वजनिक इमारतीचा प्रचारासाठी वापर केल्याचं उघड झालं आहे. निवडणूक निरीक्षकांनी मंगळवारी धाड टाकली. तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते या इमारतीतून पळाले. राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतून संत नरहरी सभागृह बांधण्यात आलं आहे. या सार्वजनिक सभागृहात पाटणी यांनी कार्यकर्त्यांची जेवणावळी ठेवली होती. निवडणूक निरीक्षकांना पाहून कार्यकर्त्यांनी जेवण सोडून पळ काढला. विशेष म्हणजे हे सार्वजनिक सभागृह शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या शेतात हे बांधण्यात आलं आहे.

close