कृषीमंत्र्यांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी, 1 एप्रिलनंतर भरपाईचं आश्वासन

March 21, 2015 8:19 PM0 commentsViews:

rada krushan21 मार्च : नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची आज (शनिवारी) केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी पाहणी केली. जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या अवकाळी पाउस आणि गारपिटीने जिल्ह्यातील निफाड दिंडोरी आणि सिन्नर या भागातील द्राक्षबागा कांदा आणि गहू या पीकांच प्रचंड नुकसान झालं होतं.

या गारपीटग्रस्त भागाची पाहणी आज राधामोहन सिंह यांनी केली. केंद्रीय कृषीमंत्री या भागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भेटले आणि नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेतला. या नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाल्यावर एप्रिल 1 नंतर नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन यावेळी शेतकर्‍यांशी बोलताना कृषीमंत्र्यांनी दिलंय. या वेळी कृषी आमदनी योजना त्यांनी जाहीर केली. डिसेंबरमधील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना येत्या तीन दिवसांत मदत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनंही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close