गडचिरोलीत गिधाड ‘भरारी’

March 21, 2015 10:18 PM0 commentsViews:

gidhada_gadchiroli21 मार्च : देशात गिधाडांची संख्या कमी होत असताना राज्यात सर्वाधिक गिधाडांची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झालीय.

भारतातल्या जंगलात गिधाडांच्या नऊ जाती असून त्यातली गडचिरोलीतील लांब चोचीची आणि पांढर्‍या पाठीची तब्बल एक दोन नव्हे तर 180 गिधाडे सिरोंचा वनविभागातल्या कमलापूर वनपरिक्षेत्रात आढळली आहेत.

विशेष म्हणजे या भागात गिधाडं नामशेष झाली होती. 8 ऑक्टोबर 2013 मध्ये छल्लेवाडा या गावाजवळ गिधाडांची पहिल्यांदा नोंद झाली.

यानंतर या भागात गिधाडांची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नांना यश आलंय. या गिधाडांसाठी वनविभागाने गिधाड रेस्टॉरंट तयार केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close