पनवेलमध्ये चर्चवर दगडफेक करणार्‍या तिघांची ओळख पटली

March 22, 2015 2:15 PM0 commentsViews:

. panvel saint george churchjpg

22  मार्च :  नवीन पनवेलच्या सेक्टर 19 मधील सेंट जॉर्ज चर्चवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांपैकी तिघांची ओळख पटली आहे.

नवीन पनवेलला जोडणार्‍या फ्लायओव्हर शेजारी सेंट जॉर्ज कॅथलिक चर्च आहे. या चर्चवर बाईकवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी चर्चच्या दिशेने दोन-तीन दगड फेकले आणि चर्चच्या तळमजल्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. हा हल्ला होत असताना पहारेकरी बाईकच्या दिशेने धावले, पण ते येत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी पळ काढला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

चर्च व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी दगडफेक करणार्‍यांपैकी तिघांची ओळख पटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात दिली आहे.तसंच आरोपींवर कठोर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चर्चभोवती पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close