संसद परिसरात भीषण आग; जीवितहानी नाही

March 22, 2015 3:52 PM0 commentsViews:

22 मार्च :  दिल्लीत संसदेच्या परिसरात रविवारी दुपारी भीषण आग लागली असून आगीचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. सुदैवाने सुट्टीचा दिवस असल्याने संसदेच्या परिसरात नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

संसदेच्या रिसेप्शनजवळ रविवारी दुपारी भीषण आग लागली. झाडांमुळे आगीचे लोळ वेगाने पसरलं होतं. आगीमुळे संसदेतील मुख्य इमारतीला कोणतंही नुकसान झालं नसल्याचं स्पष्टीकरण अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. संसदेच्या गेट नंबर 5 जवळील एसी प्लँटजवळ आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close