वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा राणेंना पाठिंबा?

March 22, 2015 4:38 PM0 commentsViews:

sharad pawar and rane

22  मार्च : वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपला उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि शरद पवार यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 11 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेतर्फे बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने यापूर्वीचं उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, तर काँग्रेसतर्फे नारायण राणे रिंगणात उतरणार आहेत. येत्या मंगळवारी अर्ज दाखल करण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ही निवडणूक सोपी नसल्याचं त्यांनाही ठाऊक आहे. म्हणूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून पाठिंबा मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज लगेचच ते पवारांना भेटले आणि वांद्र्यात उमेदवार न देण्याची विनंती त्यांनी केली. ती पवारांनी मान्य केल्याचं कळतं.

विधानसभा निवडणुकीत आपल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का बसलेल्या राणेंसाठी ही अस्तित्वाचीच लढाई मानली जातेय. त्यामुळे आता वांद्र्यात तृप्ती सावंत विरुद्ध नारायण राणे असा, म्हणजेचं शिवसेना विरुद्ध राणे अशी ‘काँटे की टक्कर’ होणार असल्याचं निश्चित झालं आहे. ही लढत सेनेसाठी प्रतिष्ठेची आणि राणेंसाठी अस्तित्वाची असल्यानं पुढच्या काही दिवसांत वांद्यात मोठा राडा रंगण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष मतदानात कोण, कुणाला, कशी मदत करतं, यावरच निकाल अवलंबून आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close