चिदंबरम् यांच्या इंग्रजी भाषणाला काँग्रेस कार्यकर्ते कंटाळले

October 7, 2009 9:19 AM0 commentsViews: 3

7ऑक्टोबर पुण्यातल्या प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम् यांनी इंग्रजीत भाषण केलं. भरीत भर म्हणून चिंदबरम् यांच्या भाषणांच भाषांतर हिंदीतून करण्यात येत होतं. काँग्रेस भवनाच्या प्रांगणात झालेला हा अत्याचार व्यासपीठावरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनाच सहन झाला नाही. माजी आमदार बाळासाहेब शिवरकर जांभया देत होते, मधूनच डुलक्या काढत होते. तर शिवाजीनगरचे उमेदवार विनायक निम्हण मोबाईला चिटकून होते. कँटेान्मेटचे रमेश बागवे, कसब्यातले रोहीत टिळक अस्वस्थ होते. समोर प्रेक्षक म्हणून बसलेल्या दोन्ही काँग्रेसचे बहुतांशी धरून आणलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्याचा मार अशी झाली होती.

close