गुंडाच्या धमक्यांना घाबरून स्वत:च्याच मुलीचं केलं मुंडन!

March 22, 2015 8:31 PM2 commentsViews:

22  मार्च :  आपली मुलगी सुंदर दिसावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. मात्र काही नराधमांच्या धमक्यांमुळे ठाण्यातील मातेवर आपल्याच मुलीचं मुंडन करण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील कळवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

कळवा इथे राहणार्‍या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यापूर्वी म्हणजेच 30 जुलै 2014ला सामूहिक बलात्कार झाला होता. मोहम्मद लियाकत अली उर्फ बाबू आणि त्याच्या 16 वर्षांच्या साथीदारानं पीडित मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी बाबूला अटकही झाली होती. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे आणि जामिनावर बाहेर येताच त्याने पीडित मुलीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. त्याची हिम्मत इतकी वाढली की तो मुलीच्या घरी जाऊन तिची छेड काढायचा आणि आता तर त्याने गुन्हा मागे घे नाहीतर पुन्हा बलात्कार करू अशी धमकीच दिली.

ही काही पहिली धमकी नाही. आरोपी बाबू तुरुंगात होता. तेव्हासुद्धा त्याच्या कुटुंबीयांनी आपल्यावर पाचवेळा हल्ले केले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व प्रकाराची या कुटुंबाने पोलिसांत तक्रारही केली. पण, पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. सततची धमकी, हल्ले, मुलीला होणारा त्रास आणि पोलिसांची कुचराई यामुळे धास्तावलेल्या या आईने अखेर आपल्या मुलीचं मुंडन करून तिला विद्रूप केलं. यामुळे तरी तिची छळातून सुटका होईल, असं या आईचं म्हणणं आहे.

दरम्यान, या धक्कादायक प्रकार समोर येऊनही कळवा पोलिसांनी आधी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस सहआयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर, मुलीच्या जबानीनुसार कळवा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ठाणे सहपोलीस आयुक्त व्ही .व्ही लक्ष्मीनारायण यांनी सबंधित आरोपींचे जामीन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. पण अजून आरोपीला अटक झालेली नाही आणि कळव्यातल्या झोपडपट्टीत राहणारं हे कुटुंब अजूनही भीतीच्या छायेखाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinit Gavankar

    Ata parayanta yancha incounter vayala pahije hota . Kya chu giri ahe . Apale magache upa mukya mantri manalele ki kapun taka yahca to bhag .

  • Vinit Gavankar

    Encounter kara yacha . ghabarun comment delete karu naka :) . Asa kelyanech mag, kya hoyil ya bhitine takkal karava lagata .

close