मतदानाच्या दिवशी मॉल-थिएटर बंद

October 7, 2009 9:22 AM0 commentsViews: 3

7 ऑक्टोबर मतदानाच्या दिवशी कामाला बुट्टी मारून मौज-मजा करणार्‍या खुशालचेंडू मंडळींना निवडणूक आयोगानं यावेळी चाप लावला आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला मंुबईसह राज्यातली नाटक-सिनेमाची थिएटर्स, मॉल्स आणि हॉटेल्सही बंद राहणार आहेत. याविषयी राज्यसरकारने आदेश दिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे राज्यसरकारनं हा निर्णय घेतला. मतदानाकडे पाठ फिरवून नाटक-सिनेमा, हॉटेलिंगसारखी मौज करता येणार नाही. याशिवाय खासगी टॅक्सी सेवाही बंद असणार आहे. 13 ऑक्टोबरला कामगारांना भरपगारी रजा द्यावी लागेल, असं कामगार आयुक्त अरविंदकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच सिनेमा-नाटकाऐवजी लोकांनी टीव्ही पाहावा, असा सल्लाही अरविंदकुमार यांनी दिला आहे. निवडणूक ओळखपत्र नसेल तर मतदानासाठी कुटुंबानं एकत्र यावं असं आवाहनही चावला यांनी केलं आहे.

close