शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी पंतप्रधान पंजाब दौर्‍यावर

March 23, 2015 11:31 AM0 commentsViews:

modi salute

23  मार्च :  पतंप्रधान नरेंद्र मोदी आज शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाबमध्ये जाणार आहेत. आज 23 मार्च म्हणजेच शहीद दिवस. ब्रिटीश सरकारने शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तीन महान क्रांतीकारकांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरमध्ये फाशी दिली होती. या तिन्ही शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये जाणार आहेत.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला या गावात पंतप्रधान जाणार आहेत. या गावातच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यावर अंतिम संस्कार झाले होते. पंजाबमध्ये जाणार असल्याबाबतची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर दिली. तसंत पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातूनही शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या सुखदेव, भगतसिंग, राजगुरू या शहिदांना शतश: नमन, अशा शब्दांत त्यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हुसैनीवाला गावासोबतच सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बागेलाही भेट देणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close