वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तृप्ती सावंत यांनी भरला अर्ज

March 23, 2015 1:22 PM0 commentsViews:

Trupti sawant

23  मार्च : वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमदेवार तृप्ती सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना विभाग अध्यक्ष अनिल परब, भाजप आमदार आणि मुंबई प्रदेशध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह भाजपचे खासदार पूनम महाजन या वेळी आवर्जुन उपस्थित होत्या.

शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांना उमेदवारी दिली आहे. तर, त्यांच्याविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडेच राहण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली असताना नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून त्यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे ही लढत सेनेसाठी प्रतिष्ठेची आणि राणेंसाठी अस्तित्वाची असल्यानं पुढच्या काही दिवसांत वांद्यात मोठा राडा रंगण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close