संजय निरुपम यांच्यावर पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप

October 7, 2009 9:27 AM0 commentsViews: 3

7 ऑक्टोबर संजय निरुपम आणि काँग्रेसचे चारकोप विधानसभा मतदारसंघातले उमेदवार भरत पारेख पैसे वाटत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. कांदिवलीच्या लालजीपाडा भागात निरुपम आणि पारेख आले होते. त्यावेळी हे दोघे मतदारांना पैसे वाटतायत असं आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत निरुपम यांची गाडीही फोडली. त्यामुळे निरुपम आणि पारेख आपल्या गाड्या जागेवरच सोडून तिथून निघून गेले. निरुपम यांच्या गाडीमध्ये दारुच्या बाटल्या तसंच दोन बंद बॅगा सापडल्या. पण या बँगांमध्ये काय आहे हे समजू शकले नाही.या प्रकरणी संजय निरुपम यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

close