महाराष्ट्र श्री सुहास खामकर

March 23, 2015 3:50 PM0 commentsViews:

23  मार्च :  महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि कंडरे फिटनेस हब आयोजित राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धा पंढरपूरमध्ये पार पडली. या स्पर्धेत 246 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सुहास खामकर हा महाराष्ट्र श्री ठरला, तर महिलांमध्ये ठाण्याची करुणा वाघमारे हि मिस महाराष्ट्र झाली.सुहास खामकरने महाराष्ट्र श्री हा किताब आजवर आठव्यांदा पटकाविलाय. यापुढे आपण महाराष्ट्र श्री या स्पर्धेत उतरणार नसल्याची घोषणा सुहासने पंढरीत केलीय.येत्या 10 एप्रिलला सातारा येथे होणार्‍या ऑल इंडिया स्पर्धेसाठी सुहास खामकर आणि करुणा वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.आजच्या अंतिम स्पर्धेत सुहास खामकर आणि मुंबईचा प्रशांत साळुंखे याच्यात जबरदस्त चुरस दिसून आली

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close