व्यंकटरमण रामकृष्णन यांना नोबेल पुरस्कार

October 7, 2009 11:24 AM0 commentsViews: 45

7 ऑक्टोबर भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञ वेंकटरमन रामकृष्णन यांना यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेचे थॉमस स्टिझ आणि इस्रायलचे ऍडा योनाथ या दोघांबरोबर रामकृष्णन यांना हा पुरस्कार विभागून मिळाला आहे. डीएनएच्या महत्त्वाच्या शोधाबद्दल या तिघांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. रायबोझोम्स कार्य कसं चालतं याचा शोध त्यांनी लावला. ऍन्टीबायोटिक्स बनवण्यासाठी हा शोध खूप महत्त्वाचा आहे. वेंकटरमन यांनी बडोदा विद्यापीठातून 1971 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत पीएचडीची पदवी मिळवली. विज्ञानात नोबेल मिळवणारे हरगोविंद खुराणा आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्यानंतर रामकृष्णन हे तिसरे भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत.

close