पनवेल चर्चवर हल्ल्यामागे परदेशी शक्तींचा हात -खडसे

March 23, 2015 5:15 PM0 commentsViews:

eknath_khadse_banner23 मार्च : नवीन पनवेल चर्चवर हल्ल्यात परदेशी शक्तींचा हात आहे. यामध्ये राजकीय व्यक्तींचाही समावेश आहेत, असं वक्तव्य अल्पसंख्याक आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केलंय.

विरोधी पक्षांनी यासंबंधी स्थगन प्रस्ताव मांडला. पण हा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. यानंतर आज खडसेंनी हे वक्तव्य केलंय. राज्यातल्या ख्रिश्चन समाजामध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचा आरोप करत विरोधकांनी याप्रकरणी विधानसभेतून सभात्याग केला. पण विरोधकांचे आरोप अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले. पनवेल चर्च हल्ला प्रकणाच्या मुळाशी सरकार जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं खडसे यांनी यावेळी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close